मल्चिंग फिल्म निर्मितीचा व्यवसाय ठरेल फायदेशीर



, मल्चिंग फिल्म निर्मितीचा व्यवसाय ठरेल फायदेशीर




Details


मल्चिंग फिल्म हा सध्याच्या काटेकोर शेतीतील एक महत्त्वाचा घटक होऊ पाहत आहे. या फिल्मची निर्मितीची यंत्रे व तंत्रज्ञान भारतामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अनेक उद्योजक उतरल्यास शेतकऱ्यांना कमी किंमतीमध्ये फिल्म उपलब्ध होऊ शकेल. शैलेश जयवंत साधारणतः १९५०पासून शेतीमध्ये प्लॅस्टिक मल्चिंग फिल्मचा वापर सुरू झाला. पॉलीइथिलीन प्लॅस्टिकपासून ही फिल्म बनविली जाते. - प्लॅस्टिक पातळ फिल्मद्वारे पिकातील किंवा फळबागेतील जमीन झाकली जाते. त्यामुळे पिकाला दिलेले पाणी संपूर्णपणे पिकासाठी वापरले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. - ही फिल्म वातावरणासाठी रोधक म्हणून कार्य करते. त्यामुळे बाह्य वातावरणाचा जमिनीवरील विपरीत परिणाम रोखले जातात. - वेगवेगळ्या रंगांच्या फिल्मचा पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास जगभर होत आहे. मल्चिंग फिल्मचे फायदे १) पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी फायदेशीर. २) सूर्याच्या उन्हामुळे जमिनीचे वाढणारे तापमान कमी राहते. तापमानातील अचानक चढउतारामुळे होणारे मुळांचे नुकसान कमी होण्यास मदत होते. ३) जमिनीतीत पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. ४) पिकाचा दर्जा वाढवते. ५) खताचा ऱ्हास कमी होतो. ६) जमिनीची धूप कमी होते. आजवर आयात करावी लागणारी फिल्म भारतामध्ये बनविणे शक्य झाले आहे. त्याविषयीचे ब्लोन फिल्म आणि कास्ट लाईन ही दोन्ही तंत्रज्ञाने भारतामध्ये उपलब्ध आहेत. - मल्चिंग फिल्म ब्लोन मोल्डेड एक्स्टुजन या तंत्रज्ञानाद्वारे बनविता येते. या विषयीची अधिक माहिती व त्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पॉलिमरची माहिती तज्ज्ञांकडून उपलब्ध होऊ शकेल. - या फिल्मच्या निर्मितीसाठी विविध प्रकारची व आकाराची एक्स्ट्रूजन यंत्रे उपलब्ध आहेत. आपली गरज आणि आर्थिकक्षमतेनुसार त्यांची निवड करता येते. मल्चिंग फिल्म बनविताना घेण्याची काळजी. - छिद्र विरहित (Impermeable Air proof) हवाबंद व बाष्पीभवन मज्जाव करणारी असावी. - ती पारदर्शक नसावी. - फिल्ममधील रसायने ही जमिनीसाठी हानिकारक नसतील, याची काळजी घ्यावी. - फिल्म ही तापमान स्थिर राखणारी असावी.
Terms of Use     Privacy Policy     Discalimer     Site Map       All Right reserved Copyright © 2016 AMP-SOFT IT SOLUTIONS