Details
सिंचन व्यवस्थापन- - ठिबक सिंचन संच असल्यास, त्याच्या नळ्या पसराव्यात. ठिबक सिंचनपद्धतीत पाणी देण्यासाठी तोट्या (ड्रिपर) किंवा सूक्ष्मनलिका (मायक्रोट्यूब) वापरतात. पाणी सर्वदूर समप्रमाणात देण्यासाठी साध्या तोट्याऐवजी दाब नियमक तोट्यांचा वापर खर्चिक असला, तरी अंतिमतः फायदेशीर ठरतो. यामुळे पाण्याचा दाब ९० ते ९५ टक्के सारखा राखला जातो. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. जमिनीची मशागत आणि निंदणी करावी. पाण्याची गरज - वय (वर्षे) --- पाणी (प्रतिदिवस प्रतिझाड) - संत्रा व मोसंबी - एक --- ९ लिटर चार --- ४० लिटर आठ --- १०५ लिटर दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक --- १३१ लिटर लिंबू - एक --- ६ लिटर चार --- १९ लिटर आठ --- ५७ लिटर दहा व त्यापेक्षा अधिक --- ९२ लिटर. मृग बहराचे फळ व्यवस्थापन - - फळगळ कमी करण्याकरिता, २, ४-डी दीड ग्रॅम किंवा जिब्रेलिक आम्ल दीड ग्रॅम अधिक कॉर्बेन्डाझिम (५० डब्ल्यू. पी.) १०० ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. - मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, एक ग्रॅम जिब्रेलिक आम्ल अधिक माेनोपोटॅशिअम फॉस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशियम नायट्रेट (२ टक्के) २ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने फवारावे. रोग व्यवस्थापन - - फायटोफ्थोरा ग्रस्त झाडावर, मॅन्कोझेब अधिक मेटॅलॅक्झिल एम (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम किंवा फोसेटील अल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. उर्वरित द्रावण झाडाभोवतीही टाकावे. - झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. त्यासाठी १ किलो मोरचूद ५ लिटर पाण्यात व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून बोर्डोपेस्ट करावी. कीड व्यवस्थापन - या महिन्यात पिकलेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव असतो. अर्धा मि.ली. मिथाईल युजेनाल आणि अर्धा मिली मॅलाथिऑनचे मिश्रण रुंद तोंडाच्या बाटलीमध्ये ठेवावे. नरमाशा त्याकडे आकर्षित होऊन त्यास बळी पडतात. फळ तोडणीच्या ६० दिवसांपूर्वीपासूनच या मिश्रणाच्या २५ बाटल्या प्रतिहेक्टर क्षेत्र याप्रमाणे बागेत ठेवाव्यात. यातील कीटकनाशकाचे द्रावण दर ३० दिवसांनी बदलावे. - कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी) डायकोफॉल २ मि.ली. किंवा इथिऑन २ मि.ली. किंवा प्रोपरगाइट १ मि.ली. किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. डॉ. दिनकरनाथ गर्ग, ९८२२३६९०३० ०७२५-२५००३२५ (केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)