Details
भेंडीवरील शेंडा, फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ढगाळ वातावरणात दिसून येतो. ही कीड विविध मालव्हेशीअस कुळातील पर्यायी यजमान वनस्पती जसे कापूस, पेटारी, जास्वंद, हॉलीहॉक इ. वनस्पतीवर उपजीविका करते. नुकसानीचा प्रकार - किडीचा मादी पतंग पानावर, कळीवर, कोवळ्या फळांवर अाणि शेंड्यावर निळे अंडी घालतो. सुरवातीला अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळ्या शेंड्यावर छिद्र पाडून अात शिरते. त्यामुळे कोवळे शेंडे सुकून जातात. त्यानंतर अळी फळांना छिद्र पाडून अात शिरते व फळाच्या अातील भाग खाते. नियंत्रण व्यवस्थापन - - एकात्मिक कीड नियंत्रणावर भर द्यावा. प्रादुर्भावग्रस्त फळे, शेंडे, फुले, कळ्या, नियमितपणे वेचून मातीत पुरून नष्ट करावीत. - प्रति १० मीटर अंतरावर एक याप्रमाणे (हेक्टरी कमीत कमी १००) कामगंध सापळ्यांचा वापर करावा (सापळ्यात इरवीट ल्युरचा वापर करावा). त्यामुळे नर पतंग सामूहिकरीत्या आकर्षित होतात. कामगंध सापळ्यामध्ये आकर्षित नर पतंग नष्ट करावेत. - लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर मका, ज्वारी, बाजरीची पीकाभोवती दोन रांगेत लागवड करावी. त्यामुळे पतंगाला मूळ पिकामध्ये येण्यासाठी अडथळा निर्माण होतो. - ट्रायकोग्रामा चीलोनीस या अंड्यावरील परोपजीवी मित्रकीटकाचा वापर करावा. (प्रतिहेक्टरी दीड लाख अंडी) रासायनिक नियंत्रण -(नॅपसॅक पंपाद्वारे) फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट (५ एसजी) ०.३५ ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन (३० ईसी) ०.७५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि संपर्क - डॉ. संतोष केदार ९५४१०५६०६६ (कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)