Details
- श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर रासायनिक खतांचा जास्त वापर म्हणजे जास्त उत्पादन असे समीकरण शेतकरी बंधु करतात पण जमिनीची काळजी न घेता रासायनिक खतांचा अतिरेक वापर हा हानिकारक असू शकतो, त्यामुळे डाळिंब रोगास जास्त बळी पडू शकतो. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे माती परीक्षण करून एकात्मिक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापण करणे अतिशय गरजेचे आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डाळिंब एकात्मिक खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापण हा लेख लिहित आहे. डाळिंब पिकाला आपली भूक भागवण्यासाठी 17 अन्नद्रव्याची, सेंद्रिय खतांची आणि जिवाणू खतांची गरज असते व ते संतुलित पद्धतीने म्हणजे डाळिंब पिकाला ज्या अवस्तेमध्ये, ज्या अन्नद्रव्याची, ज्या प्रमाणात, ज्या स्वरूपात गरज आहे ते उपलब्ध करून देणे होय. खते वापरताना घ्यावयाची काळजी :- - कोणतेही कॅल्शिअम युक्त खतामध्ये सुल्फेट युक्त खते मिसळू नये, मिसळल्यास जिप्सम तयार होतो व तो सुल्फेट व कॅल्शिअम उपलब्ध होऊ देत नाही. - कोणत्याही फॉस्फरस युक्त खतांमध्ये कॅल्शिअम व मिक्रोनुट्रिएन्ट युक्त खते मिक्स करू नये. - चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअम युक्त खते टाकू नये, जसे कि जिप्सम, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम नायट्रेट. श्री. ओमप्रकाश हिरे आणि राजू गाडेकर - पाणी तोडणे व पानगळ करते वेळी घ्यावयाची काळजी - डाळिंबाचा बहार धरण्यापूर्वी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे झाडाला ताण देणे किंवा विसावा देणे. जर जमिनीत व झाडात कर्ब : नत्र गुणोत्तर 10 ते 12 : 1 असेल तर येणारी फुले गुच्छ स्वरूपात किंवा झुपक्याने येतात, मादी व नराचे शेकडा प्रमाण 70 : 30 योग्य असते. त्यामुळे चांगले परागीभवन होते. त्यासाठी ताण काळात जोपर्यंत झाडे कार्यक्षम व हिरवीगार असताना म्हणजे पानांची कर्ब ग्रहनाची क्रिया चालू असते. त्यावेळी 5 ग्रॅम 00 : 52 : 34 व 5 मिली मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट प्रति लिटर पाणी असा फवारा घ्यावा, हि फवारणी ताण काळात दोन वेळेस घ्यावी. - पाण्याचा ताण हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस तर भारी जमिनीत 45 ते 60 दिवस पाणी बंद करावे. - डाळिंबाला कमीतकमी नयसर्गिक ताण बसने महत्वाचे, म्हणजे 5 % पर्यंत आतील जुने पाने गळणे व पूर्ण शेंड्याची वाढ थांबणे होय. परंतु या अवथ्येच्या पूर्वी जर पानगळ केली तर फुलांऐवजी शेंडे निघतात व सेटिंग लांबते. म्हणून वरील प्रमाणे नयसर्गिक पानगळ झाल्यानंतर इथ्रेल चा स्प्रे घ्यावा. - इथ्रेल ऐवजी इतर कोणतेही रासायनाने पानगळ करू नये, फवारणी नंतर कमीत कमी 80 % पानगळ होणे आवश्यक असते, 80 ते 100 % पानगळ झाल्यावर लगेच पाणी चालू करावे. - इथ्रेल चा वापर नयसर्गिक पानगळ किती झाली त्यापद्धतीने कमी जास्त करून 1 ते 2.5 मिली प्रति लिटर व त्यात 0 : 52 : 34 @ 5 ग्रॅम प्रति लिटर टाकून फवारणी सायंकाळी करावी कारण दुपारी पानांचा stomata बंद असतो. - जमिनीची आडवी हुबी नांगरणी करून झाडालगतची जमीन चाळून घ्यावी. - पानगळ करण्याअगोधर 1 % व पानगळ झाल्यानंतर 0.5 % बोर्डो मिक्सचर चा छाटणी करून स्प्रे घ्यावा. - पाणीच्या तानानंतर पहिले पाणी देण्याअगोदर बेसल डोस खालील पद्धतीने भरावा. - 10 kg शेणखत + 1 किलो व्हर्मीकंपोस्ट + 500 ग्रॅम निंबोलीपेन्ड प्रति झाड जेथे ड्रीपर चे पाणी पडते तेथे खंडा करून भरावे व त्यावर 150 ग्रॅम DAP + 100 ग्रॅम MOP + 100 ग्रॅम युरिया + 100 ग्रॅम मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट + बेनसुल्फ 10 ग्रॅम प्रति झाड टाकावे व वरून पालापाचोळा टाकून आच्छादन करावे. - डाळिंब पिकाला स्लरिचा वापर (अती महत्वाचे) खालील तिन्ही स्लरिंचा वापर दोन महिन्यातून एकदा असा कमीतकमी तीन दा करावा, त्यामध्ये पहिले पाणी दिल्यानंतर 0 ते 45 दिवसांमध्ये एकदा, 45 ते 90 दिवसांमध्ये एकदा व 90 ते 120 दिवसांमध्ये एकदा करावा. 1. जिवाणू खते स्लरी :- 20 किलो शेणखत + 10 लिटर गोमुत्र + 2 किलो काळा गूळ + 500 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर + 500 ग्रॅम फॉस्फेट सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम ( PSB) + 500 ग्रॅम पोटॅश सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम (KSB) + 1 लिटर EM 2 द्रावण + 300 लिटर पाणी. 2. जिवाणू बुरशीनाशके स्लरी :- 20 किलो शेणखत + 10 लिटर गोमुत्र + 2 किलो काळा गूळ + ट्रायकोडर्मा 1 किलो + स्पिडोमोनास 1 किलो + स्पासिलोमायसीज 1 लिटर + 300 लिटर पाणी. 3. सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी :- 20 किलो शेणखत + 10 लिटर गोमुत्र + 25 किलो निंबोलीपेन्ड + 5 किलो झिंक सुल्फेट + 5 किलो फेरस सुल्फेट + 5 किलो मॅग्नेशिअम सुल्फेट + 1 किलो बोरॉन + 300 लिटर पाणी. वरील तिन्ही स्लरी आधी 100 ते 150 लिटर पाण्यात बनवून 5 ते 6 दिवस सावलीत ठेवायची, दररोज 2 मिनिट हलवायची किंवा चांगली मिक्स करायची व 7 व्या दिवशी उरलेले पाणी त्यात टाकून वापश्यावर जमिनीत पिकास आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावी साधारणतः 1 लिटर प्रति झाड, एक एकर साठी. टिप.. शक्य तो जिवाणू खते स्लरी आणि जिवाणू बुरशीनाशके स्लरी एकत्र करू नये व वरील स्लरी वापरताना दोन स्लरीनमध्ये कमीत कमी 2 दिवसाचे आंतर ठेवावे. ड्रीप द्वारे विद्राव्य खतांचा वापर :- - पहिले पाणी दिल्यानंतर 0 ते 30 दिवसापर्यंत 12 : 61 व 13 : 40 : 13 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 30 ते 60 दिवसापर्यंत 13 : 40 : 13 व 0 : 52 : 34 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 60 ते 90 दिवसापर्यंत 0 : 52 : 34 व 13 : 0 : 45 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 90 ते 120 दिवसापर्यंत Pottasium Schoenite व 0 : 52 : 34 दोन्ही मिळून 4 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - पहिले पाणी दिल्यानंतर 120 ते 150 दिवसापर्यंत 0 : 0 : 50 @ 3 किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने 5 वेळेस द्यावे. - कॅल्शिअम नायट्रेट चा वापर 5 किलो पर एकर ड्रीप द्वारे किंवा 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी द्वारे 2 महिन्यातून एकदा गरजेनुसार करावा. ड्रीप द्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर :- - पहिले पाणी दिल्यानंतर 0 ते 45, 45 ते 90 आणि 90 ते 120 दिवसामध्ये 3 वेळेस 3 लिटर पर एकर चिलेटेड मिक्स/मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट द्यावे. फवारणीद्वारे खत मात्रा :- - फुले येण्यापूर्वी 2 ग्राम प्रती लिटर ने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट चा स्प्रे घ्यावा. - फुलगळ होत असेल तर 2 प्रती लिटर ने बोरॉन चा स्प्रे घ्यावा. - 50 % फुले आल्यानंतर 2 ग्राम प्रति लिटर ने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट व 12 : 61 @ 5 ग्राम प्रति लिटर चा दुसरा स्प्रे घ्यावा. - फळ तोडण्यापूर्वी 10 दिवस potassium schoenite 5 ग्राम प्रति लिटर ने स्प्रे घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. ओमप्रकाश यशवंत हिरे पी. एच. डी. विद्यार्थी मृद विज्ञान आणि कृषि रासायनशास्त्र म. फु. कृ. वि. राहुरी 7588015491आणि श्री. राजू गाडेकर कृषि सल्लागार (एम. एस. सी. भाजीपालाशास्त्र 7709490777 कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहिती वाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)" या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो... या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते... आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही... मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका... || अन्नदाता सुखी भवः || होय आम्ही शेतकरी