कृषी अवजारांचे पॅकेजिंग



, कृषी अवजारांचे पॅकेजिंग




Details


लहान कुदळीपासून ते अवजड ट्रॅक्टरपर्यंत सर्व प्रकारची यंत्रे शेतीकामासाठी वापरली जातात. मात्र कारखान्यातून उत्पादित अवजारे शेतकऱ्यांपर्यंत माेडतोड न होता पोचवण्यासाठी त्याच्या याेग्य पॅकेजिंगची गरज असते. शैलेश जयवंत आधुनिक काळानुसार कृषी अवजारांच्या पॅकेजिंगमध्ये सुधारित तंत्रज्ञान येत आहे. अभियांत्रिकी अवजारांचे पॅकेजिंग : अभियांत्रिकी औजारांचे पॅकेजिंग करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा. १) अवजारांचे प्रकार व आकार : ज्या अवजारांचे पॅकिंग करायचे आहे, त्याचा प्रकार व आकार यांचा विचार करून पॅकेजिंगची रचना करावी. २) महत्त्वाच्या व नाजूक भागाचे पॅकेजिंग : आकारमानाने मोठी; परंतु एखादाच भाग नाजूक असलेल्या अवजारांच्या त्या विशिष्ठ भागांना विशेष संरक्षणाची गरज असते. अशा भागाच्या पॅकेजिंगची खास रचना करावी लागते. अन्य भागांना फारशी पॅकेजिंगची आवश्यकता नसते. उदा. नांगराचा फाळाचा जो भाग महत्त्वाचा आहे, त्याचे पॅकिंग केले जाते. संपूर्ण नांगराला पॅकेजिंगची गरज लागत नाही. ३) फवारणीसाठी लागणारी किंवा तत्सम उत्पादने : अशा उत्पादनांमध्ये नाजूक भागांची संख्या अधिक असते, त्यामुळे त्यांचे संपूर्णपणे पॅकेजिंग करावे लागते. वाहतुकीदरम्यान नाजूक भाग खराब होऊ नयेत, गंजू नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. ३) ट्रॅक्टरचे विविध भाग : ट्रॅक्टरच्या विविध भागांची बहुतांशवेळा ट्रकमधून वाहतूक केली जाते. अशा उत्पादनांचे ट्रकच्या सांगाड्याबरोबर किंवा दोन उत्पादनांमधील घर्षणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रकमधून वाहतूक करताना एखादा मऊशीर आधार दोन उत्पादने किंवा ट्रकच्या सांगाडा व अवजार यामध्ये लावणे गरजेचे असते. ४) उत्पादनाची नावीन्यता : उत्पादनाची नावीन्यता ही ग्राहकासाठी आस्थेचा भाग असते. त्यामुळे संबंधित उत्पादन कोणीही वापरलेले नाही, याची खात्री देण्यासाठी काही विशिष्ठ प्रकारचे रंग किंवा आवरणांचा वापर हासुद्धा पॅकेजिंगचा भाग आहे. ५) लहान / सुट्या भागांचे पॅकेजिंग : व्ही.सी.आय. फिल्मच्या पिशव्या, कोरुगेटेड बॉक्स किंवा लाकडी बॉक्स आदींचा वापर लहान किंवा सुट्या भागांच्या पॅकेजिंगसाठी करता येतो. ६) कोरुगेटेड बॉक्स : परदेशात कोरुगेटेड बॉक्सचा वापर अखंड यंत्रांचे पॅकेजिंग करण्यासाठी केला जातो. ६) अवजरांचा दर्शनी परिणाम : काही अवजारांची रचना अशी असते की त्यांना पॅकेजिंगची गरजच लागत नाही. केवळ दर्शनी परिणामांमुळेही त्यांच्या विक्रीसाठी फायदा होतो. ७) गवताच्या पट्ट्यांचा वापर : पॅलेट फिक्श्‍चर (गवताच्या पट्ट्यांचा पॅकेजिंगसाठी वापर) हाही एक पॅकेजिंगचा पर्याय आहे. उत्पादन एखाद्या गवताच्या पट्ट्यांवर चढवून त्याला स्क्रूने घट्ट आवळून पॅक केले जाते. त्यामुळे उत्पादनाला वाहतुकीदरम्यान कमी धक्के बसतात. ८) इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल पॅनेलसाठी पॅकेजिंग : एखाद्या यंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल पॅनेल असेल, तर त्याच्या पॅकिंगसाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. अशा यंत्राच्या रचनेनुसार त्यांच्या पॅकेजिंगची रचना ठरवावी लागते. कृषी अवजारांचे पॅकेजिंगचे फायदे - अवजारे नावीन्यपूर्ण दिसतात. - त्यांची साठवणूक व हाताळणी सुलभ होते. - वाहतुकीदरम्यान मोडतोड होत नाही. - पॅकेजिंगवर संबंधित उत्पादनाबाबत माहिती दर्शक छपाई करता येते. - ब्रॅंडनिर्मितीसाठी फायदा होतो. e: shaileshjaywant@gmail.com (लेखक पॅकेजिंग उद्योगातील तज्ज्ञ आहेत.)
Terms of Use     Privacy Policy     Discalimer     Site Map       All Right reserved Copyright © 2016 AMP-SOFT IT SOLUTIONS